Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न,दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत – पालकमंत्री छगन भुजबळ

  ️  मृतांच्या   नातेवाईकांना   राज्य   शासनाकडून   ५   लाख   व   महापालिकेकडून   प्रत्येकी   ५   लाखांची   मदत ️  झाकीर   हुसेन   रुग्णालया...

 ◼️ मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून  लाख  महापालिकेकडून प्रत्येकी  लाखांची मदत

◼️ झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाणार

◼️ पालकमंत्री श्रीभुजबळ यांनी दिली घटनास्थळी भेट


नाशिक 
( प्रतिनिधी ) - कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झालेदुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. 

छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असताना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळालीत्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केलीवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केलेत्यानंतर त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळमनपा आयुक्त कैलास जाधववैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नगरगोजेडॉ.आवेश पलोडरंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले कीकोरोनाविरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहेया रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होतेत्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होतेया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते१२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडलीत्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आलीया दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असून ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहेतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेकोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून  राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहेसमितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक  इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ आणि एक सिनियर डॉक्टरचा  समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख  व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईलया घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईलआपलं काम थांबणार नाहीअधिक नियोजन करून लढा सुरू राहीलया घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईलया लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न,दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न,दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत – पालकमंत्री छगन भुजबळ
https://s.w.org/images/core/emoji/13.0.1/svg/25fc.svg
https://1.bp.blogspot.com/-m1R3v5pKjog/YIAxiUBTeUI/AAAAAAAAEeU/hAYw_Ffjn8cMvKGHczOGFIKvV0I2bD-JQCLcBGAsYHQ/s72-w400-c-h200/1-1-2-750x375.jpeg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/04/blog-post_59.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/04/blog-post_59.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content