शिरूर ( प्रतिनिधी ) - तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर निर्माण होणारा ताण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजात...
शिरूर ( प्रतिनिधी ) - तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर निर्माण होणारा ताण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांनी पुढाकार घेऊन केवळ २ दिवसात हे सेंटर उभे केले. व श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे उद्घाटन केले.
हे सेंटर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग व राव-लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रभागा मंगल कार्यालयात सुरू केले आहे. या कामासाठी मंगल कार्यालयाचे मालक प्रशांत सात्रस यांनी मदत करून मोठेपणा दाखवला आहे. परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपात मदत केली आहे. यापुढेही समाजातील दानशूर व्यक्ती या सेंटरला विविध स्वरूपात मदत करतील अशी आशा आहे.
या कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेऊन आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.
या उदघाटन समारंभ प्रसंगी तहसीलदार एल.डी. शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे, गटविकास अधिकारी विजयसिहं नलावडे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी वडघुले, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, माजी संचालक कांतीलाल होळकर, माजी सरपंच प्रशांत सात्रस, सरपंच सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, डॉ.श्रीमती इंदिरा डॅनियल, बाळासाहेब वागचौरे, अशोक चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र गिरमकर, वाल्मीक सातकर, नानाभाऊ सात्रस, माजी सरपंच संतोष दौंडकर, अशोक कोळपे, सरपंच सारिका गजानन जांभळकर, नामदेव गिरमकर, ग्रामसेवक निलेश लोंढे, राजेंद्र सांत्रस,जया शिरसाट,गोविंद सुरवसे, सरपंच कमल प्रकाश शिवले आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS