शिरूर ( प्रतिनिधी ) - शासकीय शिरूर भुमिअभिलेख अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवा.दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी शिवशंभू जिजाऊ सेनेच्या वतीने...
शिरूर ( प्रतिनिधी ) - शासकीय शिरूर भुमिअभिलेख अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवा.दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी शिवशंभू जिजाऊ सेनेच्या वतीने भूमिअभिलेख विभागाच्या सो. बडदे यांना पुन्हा निवेदन देण्यात आले.
या वेळी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या मध्ये पाचर्णे म्हणाले की, गेल्या २-३ वर्षांपासून शिरूर तालुक्यातील अनेक सामान्य शेतकऱ्यांची अनेक कामे जशी की, जमीन मोजणी, नकाशे, टीपणी इत्यादी विषय कार्यालयाकडे प्रलंबित असून शेतकऱ्यांची केवळ वेळकाढूपणा करून पिळवणूक केली जात आहे. या मध्ये शेतकऱ्यांकडून पैसे घेऊनसुद्धा त्यांची मोजणीची कामे केलीच गेली नाहीत आणि भरलेले पैसे पण त्यांना परत केले नाहीत. तसेच चुकीच्या मोजणी करून शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जातोय. संघटनेतर्फे आज पुन्हा अश्या चुकीच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे व जर १ मे २०२१ पर्यंत जर प्रलंबित असणारी शेतकऱ्यांची कामे निकाली काढली नाहीत तर ५ मे २०२१ पासून आंदोलन केले जाईल. तसेच अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींना सुध्दा आम्ही सोडणार नाही. कोरोना संकट काळात शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक ही अतिशय निंदनीय गोष्ट असून, संघटना सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे ही अशीच कामे करणार आहे.
या प्रसंगी शिवशंभू जिजाऊ सेनेंचे. संस्थापक अध्यक्ष योगेशभाऊ ओव्हाळ, शिरूर तालुका उपाध्यक्ष शैलेंद्र शेळके आणि NTV che पत्रकार अनिलजी सोनवणे, पत्रकार भगवान श्रीमंदिलकर उपस्थित होते.
COMMENTS