शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या वाढता कोरोना विषाणूच्या पादुर्भावमुळे सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तरी कोरोना वर कोणतेच औषध नाही. क...
शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या वाढता कोरोना विषाणूच्या पादुर्भावमुळे सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तरी कोरोना वर कोणतेच औषध नाही. कोरोना बचाव करायचा असेल तर सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायजर चा वापर करणे हे केले तरच आपण कोरोना पासून सुरक्षित राहू. हाच धागा पकडून शिरूर शहरातील हुडको कॉलनी येथील शैलेश जाधव मित्र मंडळानी शहरात सॅनिटायजर वाटण्याचा उपक्रम हाती घेतला. यांनी आता पर्यंत शिरुर शहरातील पाण्याच्या टाकीकडील भाग,शिरुर शहरात दिवसभर भर उन्हात थांबलेले होमगार्ड कर्मचारी आणि आपल्या साठी अहोराञ काम करणारे पोलीस कर्मचारी आणि शिरुर शहरातील पञकार बांधव यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.मागिल काही दिवसापुर्वी हुडको वसाहत मधील घरोघरी जवळपास ५०० सॅनिटायझर बाॅटल वाटप करुन आणि कचरा डेपोमधील सफाईसकर्मचारी यांना सॅनिटायझर वाटप करुन,लोकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे,बाहेरुन घरात आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावा,सॅनिटायझरचा वापर करावा,जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशी लोकजाग्रृती शैलेश जाधव मिञ परिवाराकडुन करण्यात आली.
या नंतर दिनांक १५-४-२०२१ रोजी शिरुर शहरातील पाण्याची टाकी भागात,लाॅकडाऊन मध्ये सर्वसामान्य लोकांसाठी भर उन्हात रस्त्यावर उभे असणारे होमगार्ड कर्मचारी,कोराना काळात सर्वजन घरात बसलेले असताना सर्वसामांन्य लोकांसाठी दिवसराञ काम करणारे पोलीस कर्मचारी आणि शिरूर शहरातील सर्व पञकार बांधव यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
शैलेश जाधव मिञ परिवाराकडुन जवळपास १००० सॅनिटाझर बाॅटल वाटप करण्यात आले.
COMMENTS