वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सहायक वनसंरक्षक , गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी १० टक्के आरक्षण ...
वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव
सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी १० टक्के आरक्षण
वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी ५ टक्क्यांऐवजी १० टक्के आरक्षण
मुंबई (प्रतिनिधी) - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे निर्देश वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. यामुळे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यानुसार वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी 5 टक्के आरक्षणाची तर सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी 10 टक्के आरक्षणाची नव्याने तरतूद करण्यासह वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी 5 टक्क्याऐवजी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
COMMENTS