मुंबई ( प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विधानभवन येथील महाराजांच्या सिंहा...
मुंबई ( प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विधानभवन येथील महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपमु्ख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार राहुल नार्वेकर, आमदार अनिल पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदींनी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
COMMENTS